मित्रांचे अनाथाश्रम - भाग 3

  • 11k
  • 5.3k

कुणीतरी धडक मारली, मी मागे वळून बघणार त्याच्या आधीच अम्या धावत आला आणि बोलला, " ये गाडी नाही येत का, फुटले काय तुझे"मी, "गप्प रे अम्या"पण तो एकदा सांगून कुठे ऐकणार होता, पुन्हा बोलला, " हे बघ गाडी तोडून मोडून एक कर, पण आपल्या दोस्ताला काही झाले ना तर तुझे दातच पडतो, आंधळी". तिने लाल रंगाचा स्कार्फ बांधला होता आणि काळया रंगाचा गॉगल त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. शरीराने बारीक अशी मुलगी आमच्या दोघांकडे पहात होती पण अम्याची कॅसेट सुरूच होती. त्याला कसेतरी गप्प केले आणि स्वतःहून मी माफी मागितली ते सुध्दा ती काही बोलेल याची जरा ही अपेक्षा न