म्या पायलेलं गाव- भाग 1

  • 18.5k
  • 1
  • 5.9k

*म्या पायलेलं गाव* अधून मधून सुट्टेच्यान गावागावैले फिऱ्याचा बेत निंगुन ये. कधी बाबासोबत त कधी आबासोबत निंगे. आतालोक त माये वीस पंचवीस गावं फिरून बी झाले अस्तिन. म्हणून मंग कोन्या गावाले जायाचं म्हंतल की माया भोकावर लय ये..पन काय करनार आबा अन बाबा यैच्या पुळे आपली कुटी चालते.. शेवटी इच्चा असो नसो तरी जाच लागे. खेडगाव म्हंतलं की ते मंग पार तिसक किलोमीटर ये. अन जा बी लागे त फटफटीनच, त्यात आबांच्या मानीले होती बिमारी त्यानं आजूकच आरामानं चालवा लागे... चाल्ले मंग या रस्त्यानं त्या रस्त्यानं, इकून इकुन कलवा घे तिकून कलवा घे करत, आखरी पस्तीसक किलोमीटरच