२९ जून २०६१ - काळरात्र - 10

  • 8.4k
  • 3.3k

दुसर्‍या रियालिटीमध्ये पोहोचलेली फक्त हंसीकाच नव्हती. तिच्यासोबत सारंग, शौनक आणि रचनासुद्धा होते. कारण जेव्हा ते निळ्या ग्लोस्टिक्स घेऊन बाहेर गेले होते तेव्हा सरांगला अनिचं घर दिसलं होतं आणि तिथून बाहेर आल्यावर लाल ग्लोस्टिक्स असलेले तेच त्यांना रस्त्याच्या पलीकडे दिसले होते. हे जेव्हा जिवाच्या आकांताने पळत आले तेव्हा परत एकदा त्या भयाण काळोखातून पास झाले होते आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा हे घर दुसर्‍या रियालिटी मधलं होतं. शौनक, आर्या, नीलिमा, हंसीका आणि रचना हे किचनमध्ये होते. सारंग ब्लॅकमेलिंग नोट पाठवायला म्हणून दुसर्‍या घरात गेला होता. सर्वांना असं गुंतलेलं बघून अनि आणि सक्षम हळूच हॉलमध्ये येतात. अनि किचन आणि हॉलच्या