२९ जून २०६१ - काळरात्र - 3

  • 10k
  • 4.8k

“ओह, अरे मी तुला सांगायला विसरले. चल.” असं म्हणत हंसीका शौनकला हॉलमध्ये घेऊन आली आणि तिचा फोन शौनकच्या हातात दिला. “ओह शिट, कसं झालं?” सक्षम म्हणाला. हंसीका बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात परत एकदा दारावरील बेल वाजली. नीलिमाने दार उघडलं. सारंग आणि रचना आले होते. ते दोघं घरात आले आणि सर्वांच्या चेहर्‍यावर एक समाधानाची झलक पसरली. निलीमाने भिंतीवरील घड्याळाकडे बघितले आणि म्हणाली, “साडेदहा, ओह माय गॉड साडेदहा..... सहा वाजता भेटणारे आठ लोकं साडेदहा वाजता भेटताहेत. चला आता लवकर करा.” “येस, चला आता. सर्वजण आले. जेवताना बोलूयात.” असं म्हणत आर्याने नीलिमाला दुजोरा दिला आणि ती किचनकडे वळली.