सुवर्णमती - 6

  • 7k
  • 3k

6 यथावकाश भोजन झाले. चंद्रनाग आपल्या सहज शैलीने, सर्वांना विलायतेतील गमती सांगत राहिला, सुवर्णमती मोठे मोठे डोळे करत, मोठ्या उत्सुकतेने ते ऐकत राहिली. चंद्रनाग स्वत:वर खुश होत राहिला. सूर्यनाग अधिकाधिक स्वत:च्या कोषात गुरफटत राहिला. शेवटी दिवस कलला. सर्वजण आपापल्या कक्षात विश्रांतीसाठी जाऊ लागले. सुवर्णमतीही आपल्या कक्षात निघाली. वाटेतच सूर्यनागाचा कक्ष होता. तो अजून बाहेरच उभा दिसला. लांबूनच त्याची उंच आकृती दिसताच तिची पावले थबकली. सुवर्णमती क्षणभर घुटमळली. 'बोलावे की तसेच पुढे जावे?' मग थांबून म्हणाली "काही हवे होते का आपणास? सेवक कुठे दिसत नाहीत, पाठवून देते कोणास लगेच," तेव्हा सूर्यनाग म्हणाला, "नाही, त्याची आवश्यकता नाही, मीच पाठवून दिले सर्वांस.