काळाची चौकट

  • 18.8k
  • 2
  • 5.6k

"जिवंत नाही सोडणार मी त्याला." हॉस्पिटलच्या बेडवर बसून विजय ओरडत होता. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, डोळ्यात आग पेटली होती, ओठ थरथरत होते आणि डोळ्यासमोर एकसारखे तेच दृश्य तरळत होते. ओलाचिंब रस्ता, त्यावरून बेधडक आणि बेलगाम जाणारी एक लाल कार, रस्त्यावर जमा झालेली बघ्यांची गर्दी आणि रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली 'ती'. आज सहा महिन्यानंतर तो कोमातून उठला आणि त्याने पहिलाच प्रश्न केला "मी कोण आहे ?" कितीही प्रयत्न केला तरी त्याला स्वतःबद्दल काहीच आठवेना. तो डोक्याला ताण देऊन भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न करू लागला आणि अचानक त्याला 'ते' दृश्य दिसले. त्याच्याच घरासमोर पडलेल्या त्याच्या बायकोचा तो निश्चल