कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२४ वा

  • 10.3k
  • 3.6k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २४ वा ------------------------------------------------------------------------------------------------ चौधरीकाकांच्या घरात शिफ्ट होऊन ..मधुरा आणि तिच्या तिघी मैत्रिणींना आता जवळपास महिना होत होता . घराचा बिकट वाटणारा प्रश्न चौधरीकाकां मुळे इतक्या सहजपणाने सुटला होता की , मधुरा आणि मैत्रिणी यांच्या मनावरचे मोठेच ओझे उतरले होते. कोलेज आणि ऑफिस , त्यात सेमिस्टर परीक्षा आलेली, मधुरा जाम बिझी होऊन गेली होती. एवढ्या सगळ्या धावपळीत ..शिफ्ट होण्याच्या दोन –तीन दिवस आधी दीदी म्हणाली .. मधुरा ..तू इथे आल्यापासून मी एकदा ही ..यशच्या आजोबा आणि आजींना भेटायला बोलायला आलेले नाही , ते नक्कीच म्हणत असतील .. पंडितजीची पोरगी मोठ्या शहरात आली की पार बदलून