मी एक मोलकरीण - 4

  • 12.2k
  • 6.1k

( भाग 4 ) मी खुप उत्साहित होते. आमच्या गावामध्ये माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मला आता कोणी चिडवण्याच्या दृष्टिने बघत नव्हते तर अभिमानाने ओळखत होते. आई ला खूपच बरं वाटायचं जेव्हा लोक आईला माझी आई म्हणून ओळखली लागले. आता मदन हि तिसरी मध्ये जाणार होता आणि मी अकरावी मध्ये ! आई आणि मी ब-यापैकी तयार होतो. मदनचं तर शाळेमध्ये प्रवेश व्यवस्थित झाला होता. फक्त मला एक चांगल्या कॉलेजची गरज होती म्हणून मी सरांची मदत घेण्याचे ठरवले. सरांनी माझ्यासाठी कॉलेज बद्दल चोकशी केली. सरांच्या म्हणण्यानुसार मी विज्ञान शाखेतून प्रवेश घ्यावे. त्यांनी तसे आईला बोलून ही दाखवले. माझ्या भविष्याचा