मी एक मोलकरीण - 1

  • 26.6k
  • 10.2k

( भाग 1) लहान असतानाच वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांच्या प्रेमाचे छप्पर माझ्यावरून दूर झाले. इतक्या लहानवयात मला माझ्या आईचा आधार तर छोट्या बहिण - भावासाठी बाबा बनायचे होते. आईने तर स्वतःला आमच्या तिघांसाठी सावरले होते. मी पाचवी मध्ये शिकत होते. खरं तर मी पुस्तकापेक्षा आई कडून जास्त शिक्षण घेत होते. कदाचित म्हणून मला तेव्हा पासून शिक्षणामध्ये कमी असल्याची जाणीव झाली. मी अकरा वर्ष, माझी बहिण पाच आणि भाव दोन वर्ष असताना आईला बाबा एकटे सोडून गेले होते. माझं शिक्षणाची आणि आमच्या तिघांची पालन पोषण करण्