ती रात्र - 1

  • 32.5k
  • 1
  • 21.9k

भाग १"Hello, तु कुठे आहे"हो हा मानसीचा आवाज होता ,मी अर्ध्या झोपेत होतो. मानसी असं कधीच मला कॉल वैगरे करत नाही, बोलणं झालाच तर व्हॉटसअप वर ते पण गरजेनुसार.आज तिने मला २-३ महिन्यानंतर कॉल केला असावा, रात्रीचे जवळपास ९ वाजले होते.मी दमलो होतो, ऑफिस च काम खूप असतं, त्यात तो टकल्या बॉस माझा, त्याच्या डोक्यावर केस नाही आणि आमच्या डोक्याला फेस आणतो.रूमवर मी आणि ईशांत आम्ही दोघेच होतो, तसा तो निशाचर प्राणी, रात्री जागरण करून काय करतो ते मला पण माहिती नाही आणि २ वाजता झोपणारा हा, सकाळी कसा लवकर उठणार ?तसे आम्ही ४ लोक राहतो पण जोडून सुट्टी आल्यामुळे