काशी - 1

  • 11.7k
  • 1
  • 5.5k

प्रकरण १ रात्रीची वेळ होती. सतीश सर, मनोज, राम आणि राजू ड्राइव्हर असे चौघे जण गाडीने आश्रम कडे परतीचा प्रवास करत होते. सतीश सर म्हणजे काशी आश्रमाचे संस्थापक आणि बाकी जण हे त्यांचे सहकारी, रस्त्यावरील अनाथ मुले व वृद्ध यांना शोधून त्यांना आश्रम मध्ये आश्रय देण्यासाठी रोजच्याप्रमाणे बाहेर पडलेले होते. परताना खूप रात्र झालेली होती. अचानक सर म्हणाले राजू जरा गाडी साईडला घे. तिथे अंधारात कोणीतरी बसलेलं दिसत आहे --- सरांच्या म्हणण्याप्रमाणे राजुने गाडी रस्त्याच्या एका साईडला घेतली. मनोज, राम, राजू व सर त्या बसलेल्या व्यक्तीकडे गेले. चादर गुंडाळून एक म्हातारी बसलेली होती. सरांकडे बघून