बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 7

  • 9.8k
  • 2
  • 5.1k

७. श्रीगणेशा           कृष्ण पक्षातला अष्टमीचा दिवस. साल होतं १६४५. प्रभू श्रीरामांची पत्नी सीता यांचा जन्मदिवस. यालाच जानकी अष्टमी असेही म्हणत. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. पहाटे आणि रात्रीच काय ती थंडी वाजायची. सकाळचा प्रहार उलटला कि, सूर्य डोक्यावरून खाली पश्चिमेच्या तोरण्यागडाच्या डोक्यावर येई पर्यंत ऊन चांगलंच चटकायचं. सूर्य नुकताच आपली सोनेरी किरणांची धूळफेक करत हिरव्या सह्याद्रीवर आपलं प्रकाशाचं पांघरून घालण्यासाठी सज्ज होऊ लागला. शिवबाराजे आणि त्यांचे मित्रमंडळी आज रायरेश्वराच्या रावळात जमले होते. बरोबर वडीलधारे दादोजी नरसप्रभू आणि नेताजीही होते. बाकीचे आपले नेहमीचेच! राजांनी कमरेच्या निळ्या जरीच्या दुशेल्यात खोवलेल्या म्यानातून खसकन तलवार बाहेर काढली.त्याचं धारदार पातं पिंडीसमोर