गहाण

  • 9.8k
  • 2.8k

गहाण लता भुसारे ठोंबरे शंकर तणतणतच घरी आला.मोरीवर हातपाय धुतांनाही बडबडतच धुतले आणि धुमसतचं चुलीपूढ येऊन बसला. द्रुपदा चुलीवर भाक-या टाकतांना आल्यापासून चाललेली शंकरची धुसफुस पाहत होती.आज शेतात काहीतरी घडलयं हे तीनं ओळखलं होतं."काय रं शंकर,काय झालयं एवढं वैतागायला.चहा टाकू का? "हे बघ माय ,त्या दादाला काही सांग.मी काही बोलत नाही म्हणून लईच करतोय बघ." "काय केलं रं बाबा त्यानं." "घरच्या शेताचा सगळा धुरा काढलाय बघ की."शंकर तणतणतंच म्हणाला. "आरं पर तो का करील तसं?" "जाऊन बग की एकदा शेतात.दादाला काय तेवढा धुराचं दिसतो होय काढायला.मी आपलं काही बोलतं नाही त्याचा