अहमस्मि योधः भाग - १०

  • 15.4k
  • 5k

सगळेच भयचकित नजरेने एकमेकांकडे पाहात होते. आता हळूहळू काही गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या होत्या. दोन हजार वर्षांपूर्वी चे तेच संकट त्यांच्या समोर होतं..समीर, दिग्या, स्नेहा आणि मंगेश काहीच बोलत नव्हते. काही मिनिटं त्या खोलीत एक जडशीळ शांतता पसरली. " एक मिनिट.. ह्यात लिहल्या प्रमाणे महाराज नंदक यांनी समुद्राच्या किनारी राजवाडा बांधला होता..आणि हा वाडा पण.." - समीर गंभीर स्वरात म्हणाला. " हो..तो राजवाडा याच ठिकाणी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.." - स्नेहा म्हणाली. " म्हणजे ते सात दरवाजे आणि अग्निघराकडे जाणारा रस्ता ही इथेच असेल.." - दिग्या. " हजारो वर्षांत जमिनीच्या उलथापालथीत भूभागात खूप बदल झाले आहेत.. ही वास्तू जरी