संतश्रेष्ठ महिला भाग १४

  • 6.4k
  • 2.2k

संतश्रेष्ठ महिला भाग १४ ऐसी लगन लगाई कहां तूं जासी तुम देखे बिन कल न परति है तलफि तलफी जीव जासी तेरे खातर जोगण हुंगी करवत लूंगी फासी मीरा के प्रभु गिरिधर नागर चरणकंवल की दासी "तुझ्या प्राप्तीसाठी जोगीण बनेन, वेळ पडल्यास मरण पत्करेन. गिरिधरा, ही मीरा तुझ्या चरणांची दासी आहे रे!" तिचा ठाम विश्वास होता की प्रभुचे नामस्मरण, त्याचे भजन कीर्तन हीच त्याच्या प्राप्तीची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी मथुरा-काशीला जाण्याची गरज नाही. तीर्थयात्रांची आवश्यकता नाही. बस्स प्रभुंचे नामस्मरण यातच मोक्ष आहे. आणि हे सुत्र तीने आयुष्यभर अंगी भिनवले होते. भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी जप तप तीर्थ