पेरजागढ- एक रहस्य.... - १६

  • 9.6k
  • 3.9k

१६)शेवटी रितूचा विश्वास जिंकला...इकडे इन्स्पेक्टर राठोड आज जरा सुट्टीवर होता.सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज परत त्याने चिकन बनवली होती.त्यामुळे त्यालाच पोलीस चौकीवर पोचायला वेळ झाला होता.अन्यथा सगळेजण केव्हाच पोचले होते. मागाहून जाऊन सुद्धा इतरांवर जरा राठोड खेकसला.माझ्या अगोदर येऊन जमा झाले. चांगली गोष्ट आहे. पण इथे तोंड काय पाहता माझं.काढा ती जीप. आपण येथे कशासाठी आलो हे ठाऊक नाही काय तुम्हाला? चला लवकर.. तोंड बघताय नुसती... आणि पोलीस चौकीतून गाडी निघाली पेरजागडाच्या दिशेने. काही तासात सोनापूर ओलांडून गाडी पेरजागडाच्या खालच्या आवारात जमा झाली. रोजच्या सारखं तसं गडावर कोणी नव्हतं.मंदिरात असणारा गृहस्थ पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे गेला असल्यामुळे मंदिरात असं कुणीच नव्हतं.त्यामुळे