खरंच समाजसेवा हीच इश्वरी सेवा आहे!

  • 16.2k
  • 3.7k

22. खरंच समाजसेवा हीच इश्वरी सेवा आहे! आज सामाजिक क्षेत्रात वावरतांना आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तो सामना करीत असतांना आपल्याला अनेक समस्या येत असतात. कुणी नावंही ठेवत असतात. त्यावेळी जर अशी समस्या आलीच, तर आपण निराश होतो व तोडगा न काढता ते काम सोडून देतो. समाजात अशी माणसे भरपूर असतात. जी एकमेकांचे पाय खेचत असतात. त्यांना आपणही पुढे गेलेले आवडत नाही. तसेच दुसराही पुढे जात असेल तर तेही आवडत नाही. नव्हे तर जो अशी समाजसेवा करतो. त्याचंही मन तोडण्याचं काम करीत असतात. पण काही माणसं निश्चीतच चांगली असतात. ती अशा होतकरु माणसांनी पुढं जावं म्हणून मार्गदर्शनाचं बळ देतात.