सुटका पार्ट 10

  • 9.3k
  • 1
  • 3.5k

“थांब सुरे… डोक्यातल्या एवढया सगळ्या प्रश्नांचं ओझं घेऊन जाशील तर तुलाच त्रास होईल त्याचा.” माझी पाऊलं अडखळली. क्षणभर थांबून मी मागे नजर फिरवली. डोक्यात हजारो प्रश्न होते. “एका मित्राला शोधायला अशी बाहेर पडते काय, तू असा अचानक भेटतो काय आणि रात्री पडणारी ती भयानक स्वप्न, स्वप्न की सत्य जर ती स्वप्न होती तर अंगावर या जखमा कशा? काय घडतंय? तू मूळचा इथला राहवासी नाही असं तूच सर्वांना सांगत फिरायचा तरीही त्याच्या पूर्वजांनी बांधलेलं वाडा, त्याचा हा वारस, रात्री बेरात्री होणारे भास नक्कीच इथं काहितरी भयानक आहे याची आता मला खात्री पटली आहे.” मी त्या वाड्याकडे नजर उंचावून पाहत म्हणाले.