प्रारब्ध भाग १२

  • 6.2k
  • 3k

प्रारब्ध भाग १२ यानंतर काही दिवस चांगले गेले . सुमन आता मुंबईच्या आयुष्याला सरावली होती . ती खुष असल्यावर परेशला सुद्धा बरे वाटत असे . किती झाले तरी त्याचे प्रेम होते तिच्यावर.. एके दिवशी संध्याकाळी तो घरी आला तेव्हा सुमन खुप खुशीत होती . “कपडे बदलुन जेवायला बसल्यावर त्याने विचारले “काय ग आज खुशीत दिसते .. “ हो आज मामांचा फोन आला होता. सोसायटीच्या सेक्रेटरीचे काही काम आहे मुंबईला त्यांच्यासोबत मामा उद्या येत आहेत . आपल्याकडेच येणार आहेत मुक्कामाला मला म्हणत होते माहेरपणाला चल ,लग्न झाल्यापासुन आलीच नाहीस तु गावी . “वा छान झाले मामा येत आहेत ते ,आणि तु