भिश्ती - भाग १

  • 5.2k
  • 1
  • 1.5k

भिश्ती भाग : १ ङोंगरपायथ्याच्या कुशीत ,नितळ, थंङगार पाण्याने झुळझुळत वाहणारया नदीच्या काठावर वसलेले खुर्शी गाव. भरपुर झाङ, वेली औषधी वनस्पती असलेले जंगल ,या जंगलाला थोङे लागुन काही तुरळक वस्ती. लांब लांब अंतरावर वसवलेली ही घरे वेगवेगळ्या जाती धर्माच्या माणसांची होती.शहरी भागातील चैन, सवयी तिथल्या लोकांना माहित नव्हत्या. बरीचशी वस्ती ही कुठुन तरी स्थंलातरित होऊन आलेल्या कुटुंबाची होती.त्यातल्या बरयाच जणांना त्यांचे जातकुळी पण माहित नसायची. मग गावात आहे ती प्रथा अंगवळणी पाडून घेत ती लोक त्या गावातली होऊन मिसळुन जात.हळुहळू रोटीचा आणि मग बेटीचा व्यवहार व्हायला लागला .एकमेकांच्या शेतात पिकलेले अन्न, कलाकुसरीच्या वस्तू, कपङे,ह्यांची देवाणघेवाण होत असे.तसे गुण्यागोविंदाने नांदणारे ते