भूत - भाग १

  • 16.3k
  • 1
  • 5.2k

.... तर हे भूत - बीत सगळं खोटं असतय. कळालं ?" मनोहरने स्ट्राइकर टोलवून शेवटची कवडी होलमध्ये पाडली, आणि कॅरमचा डाव आणि ' हा ' विषय दोन्ही संपवले.‌ रात्री साडे अकराची वेळ. अक्षय, मनोहर व सुरेश रविच्या घरी कॅरम खेळण्यासाठी जमलेले. आज फारच उशीर झाला होता. घरातील सर्व झोपले होते, त्यामुळे चौघेही बाहेर पोर्चमध्ये बसले होते. तास - दीड तास मस्त डाव रंगला होता, आणि चौघांच्या गप्पाही. बोलता बोलता सहज विषय निघाला की, भूतंखेतं, अमानवी शक्ती अशा गोष्टी खरच असतात का ? यावर मनोहरच म्हणणं होतं, भूत - बीत वैगेरे खोटं असतं. हे सगळे फक्त मनाचे खेळ असतात. याउलट