To Spy - 7

(21)
  • 16.8k
  • 7.3k

खोक्यात काही अल्बम्स होते. करणने ते सर्व बाहेर काढून नीट पाहिले. त्यात देशमुख साहेबांचे तरूणपणीचे त्यांच्या पत्नीसोबत व निधीसोबतचे फोटो होते. सर्व महाबळेश्र्वरमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी काढलेले होते. अल्बम परत खोक्यात भरताना करणला दिसल, की खोक्याच्या तळाशी हिरव्या रंगाच्या कसल्यातरी पदार्थाचे कण सांडले होते. पण करणने त्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित खोलीतल्या इतर बॉक्सेस मध्ये काही मिळू शकेल असा विचार करून करण दाढेंसह देशमुखांच्या खोलीत आला. " दाढे तुम्ही बेडखालच दुसरं खोक घेऊन बाहेर नेऊन ठेवा. मी कपाटाखालचे आणि वरचे बॉक्सेस घेऊन येतो." दाढेंनी लगेच बेडखालच खोक काढून बाहेर नेल. करणने आधी कपाटाखालचे बॉक्सेस काढून बेडवर ठेवल. मग वरील बॉक्सेस उतरवून सर्व