पेरजागढ- एक रहस्य.... - १४

  • 8.4k
  • 4k

१४)स्वारी पेरजागढाची... तिरीपीचा सूर्य केव्हाच वर निघून गेला. तरी माझी झोपेतून उठायची वेळ होईना.चुलीवरचा चहा कधीचं थंड पडून गेला होता, आणि सकाळचे आठ वाजले तरी उठायचं नाव नाही.म्हणून काकूने अंगावरील चादर ओढली, इतकं कुणी झोपतोय का... जा तोंड धुवून घे आधी... चहा थंड पडून गेल कवाचं. माझ्यासाठी गावाकडची मजा म्हणजे पहिल्यांदाच झाली होती. त्यामुळे पहिल्यांदा मला फार नवल वाटलं होतं. कारण आपल्याकडची सकाळ म्हणजे फक्त माझी रूम, त्या पलीकडे असलेला सूर्यनारायण बघणे कधी आयुष्यात जमलेच नाही. सगळे काही आवरता आवरता 10 केव्हा वाजून जायचे कळायचेच नाही. जेवण करून कुठे बाहेर निघावं म्हटलं तर अर्धा दिवस घरीच निघालेला असायचा. आणि