जोडी तुझी माझी - भाग 3

  • 20.5k
  • 14.1k

आता त्याला कळलं की ही त्या माणसाला रात्री का सापडली नाही ते. थोडी सारवा सारव करायच्या उद्देशाने विवेक बोलला.विवेक - " रडू नको प्लीज शांत हो आधी, अग मी परत आलो तेव्हा तू तिथे नव्हतीस मला वाटलं वॉशरूमला गेली असशील म्हणून मी किती वेळ तुझी वाट बघितली. तरी तू आली नाहीस म्हणून मग तुझी शोधाशोध सुरू केली, किती शोधलं तुला, लॉन मध्ये, हॉटेल मध्ये आजूबाजूचा सगळा परिसर शोधून काढला पण तू मिळाली नाही किती टेन्शन आलं होतं मला माहिती आहे, अशी कशी न सांगता निघून गेली, कुठे गेली विचार करून करून डोकं फाटायला आलं होतं माझं. तुझा फोनही लागत नव्हता.