त्याचा बाप

  • 9.5k
  • 3.3k

बाप दार उघडलं तेव्हा जगदीश समोर उभा होता, बरोबर एक लहान सा मुलगा, त्याच नाव "कैलास" होत ,माझ्या मते ८ १० वर्षाचा असेल , मळकट कपडे, विस्कटलेले केस, फाटक्या चपला. "साहेब, माजीवाड्या पाशी रस्त्यावरुन चालला होता रडत रडत , मी, बाईक थांबवली मला वाटलं रस्ता चुकला किंवा हरवला असावा" "तो आपल्या ठाण्या जवळ कपाशी चा बोगदा आहे ना, त्याच्या आजूबाजूला जी वस्ती आहे तिथे रहातो, आई लहानपणी च गेली, बाप सुतारकाम करतो पण तो गेले किती एक दिवस घरी आलाच नाहीय" "त्या झोपडपट्टीत हॉटेल वजा टपरी त्या वर हा काम करतो, काम संपल की बापाला शोधायला रोज बाहेर पडायचा सेंट्रल,