To Spy - 6

  • 13.6k
  • 7.4k

"हं, कम इन." पुन्हा समोरच्या कॉम्प्युटर वर लक्ष केंद्रित करत पंजवाणींने परवानगी दिली. विराट शांतपणे पुढे झाला. "बसू शकता." कॉम्प्युटर वरची नजर न हटवता पंजवाणीं म्हणाला. विराट खुर्ची वर बसला. पंजवाणी अंदाजे साठीच्या आसपास असावा. डोक्यावर अर्ध्यापर्यंत उरलेले केस, गोलाकार गोरागोमटा चेहरा, घारे भेदक डोळे, चेहऱ्यावर बेफिकीरी, लक्षात येणारी बलदंड शरीरयष्टी. त्याला बघून विराटला मराठी चित्रपटातील त्याचे आवडते खलनायक यतिन कार्येकर यांची आठवण आली. "माझं निरीक्षण करण्यासाठी नक्कीच तुम्ही आला नसाल." प्रथमच त्याच्याकडे पाहून जराशा गुर्मीतच पंजवाणीं म्हणाला. "अं.." त्याच्या बोलण्याने विराट थोडा गडबडला. मग जरा घसा खाकरून पुढे बोलू लागला. " मिस्टर पंजवाणी, तुम्हाला समजलंच असेल की तुमचे