जोडी तुझी माझी - भाग 1

(21)
  • 32.4k
  • 1
  • 20.8k

ती रस्त्यावर रडत रडतच पळत होती, तिला फार मोठा धक्का बसला होता खर तर. पळून दमल्यानंतर ती कुठेतरी एका बाकड्यावर बसली पण डोळ्यातलं पाणी मात्र थांबतच नव्हतं. तिचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलाबरोबर आपण लग्न करायला निघालो तो आपल्याला एवढा मोठा धोका देत आहे. रडून रडून डोळे लाल झाले होते आणि सुजले सुध्दा होते. आज जे बघितलं आणि ऐकलं तेच सारखं सारखं तिच्या डोळ्यापुढे फिरत होतं. ती गौरवी, दिसायला गोरीपान, देखणी, सुंदर टपोरी डोळे, लांब केस, साधी राहणी, तरीही आकर्षक. गौरवी खुप समजदार, समंजस, भोळी थोडी हळवी तरीही खंबीर अशी होती. नोकरी ही करायची कुणालाही एक नजरेत पसंत पडेल