जन्म मृत्यूच्या चक्रातून कोरोना वाचवेल का?

  • 8.2k
  • 2.7k

8. जन्म मृत्यूच्या चक्रातून कोरोना वाचवेल का? कोरोना दहशत रान माजवल्यासारखी भावना. सगळे घाबरलेले. कोणी कोरोना गो म्हणतात. पण कोरोना जा म्हटल्यास जावू शकते का?तर याचं उत्तर नाही असंच आहे. कोरोना कधी जा म्हटल्याने जाणार नाही. ये म्हटल्यानं येणार नाही. कोरोनावर लसी काढणं हमखास सुरु आहे. इटलीनं दावा केलाय. अमेरिकेला टेस्टींग साठी पाठवलाय. नव्हे तर लस शोधण्याचे प्रयत्न सर्वतोपरी होत आहेत. पण असे असतांना हा कोरोना लोकांची सुटका जन्ममृत्यूच्या फे-यातून करेल काय? की बस सर्वांनाच यमसदनी पोहोचवेल. हा प्रश्न जनमाणसासमोर उभा ठाकलेला आहे. जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून जो जन्म घेईल, तो मरणार असा नियमच आहे.