सत्याला पैशामुळे मरण आहे!

  • 10.7k
  • 3.2k

5. सत्याला पैशामुळे मरण आहे! सत्याला मरण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण सत्य रोजच्या रोज मरत असतं. कधी लाचार बनून तर कधी बदनाम होवून. कारण आज स्वार्थीपणा जास्त वाढलेला अाहे. स्वार्थीपण व पैसा कमविण्याचा हव्यास यामुळं सत्य मरत चाललेलं असून त्याला वाचवतो म्हटलं तर आपलंच मरण होत असतं. म्हणून सत्याला वाचवायला कोणीही पुढं येत नाही. घर असो की न्यायालय, शाळा असो की कार्यालय सर्वच ठिकाणी काही ना काही खोटं बोलणं असतंच. न्यायालयात तर हमखास खोटं बोललं जातं. कारण त्याशिवाय न्यायालयात पक्षकारांना न्याय मिळवून देता येत नाही. मग या खोटे बोलून खटल्याची बाजू मांडण्यात जो आरोपी असतो, तो जिंकूनही