To Spy - 4

  • 16.4k
  • 8k

नाश्ता होईपर्यंत कुणीच काही बोललं नाही. जेवतान निगेटिव्ह विषयांवर बिलकुल चर्चा करू नये, असा विराटचा आग्रह असायचा. जेवून झाल्यावर विराटच्या आई प्लेट्स घेऊन गेल्या. मग निधीने बोलायला सुरुवात केली. "पपांच आमचे बिझनेस पार्टनर मिस्टर पंजवाणींसोबत मागच्या आठवड्यात खूप कडाक्याचं भांडण झाल होत. मला तर त्यांच्या वरच doubt येतोय." "नाही निधी, बिझनेस पार्टनर्समध्ये भांडणं होतच राहतात. त्यात तेवढ्यावरून त्यांच्यावर 'असा' संशय घेणं चूकीचे आहे." विराट समजावणीच्या सूरात म्हणाला. "नाही वीर, फक्त त्या भांडणामुळे माझा त्यांच्यावर संशय नाहीये. बिझनेस पार्टनर्समध्ये भांडणं होतात हे मलाही मान्यच आहे. पण पंजवाणीबद्दल माझं मत चांगल नाही. तो अत्यंत रागीट स्वभावाचा आहे. एकदा आमच्या ऑफिस मध्ये