कोरोना व्हायरस लोभ टाळा

  • 7.9k
  • 2.3k

2. कोरोना व्हायरस;लोभ टाळा लालच बुरी बला सगळेच म्हणतात. मानतातही. पण कोणीही लोभ सोडलेला नाही. सगळीच माणसं लोभ करीत असतात. त्यातच गडगंज संपत्ती गोळा करीत असतात. प्रसंगी या लोभापायी एकमेकांचे मुदडेही पाडत असतात. सर्वांना माहित अाहे की लालच बुरी बला आहे. तरीही आम्ही लोभ का करतो? ते आम्हाला कळत नाही. कळणारही नाही. ते का बरे कळत नाही हे समजायला कारण नाही. संत सांगून गेले की लालच बुरी बला आहे. तरीही आम्ही लालच करतो आणि आपला विनाश करुन घेतो. एवढंच नाही तर महाभारतातही लोभाचा परीणाम दाखवलेलाच आहे. पांडवांनी फक्त पाच गावं मागितली होती. पण सुईच्या टोकावरही मावेल एवढीही जागा मी