सलाम-ए-इश्क़ - भाग-२

  • 10.4k
  • 4.1k

आदीचा चेहरा खुलला होता. अभिमान आदिला बघतच राहिला....- ‘आपण आपल्या आदिला इतकं खुश खूप वर्षांपासून पाहिलंच नाही’ . ...अभिशी शलाकाची ओळख करून दिल्यावर excuse me! म्हणून अभी निघून गेला ..त्याला आज आदीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काहीवेळ दुरूनच बघायचा होता. अभिमान गेल्यावर थोडं रील्याक्स होत शलाका म्हणाली- ‘सो मिस्टर इत्यादी शिर्के.....इतक्या दिवसांनी भेटलास फायनली....झालं असं की माझे ‘अहो’ ह्या संस्थेचे मेंबर आहे सो.. त्यांच्या सोबत मी आले होते आणि त्यांच्याकडे सर्व अवार्डींची नाव होती, त्यात मग नाव दिसलं....म्हटलं अरे हा तर आपला इत्यादी...तुला स्टेजवर बघून कधी एकदाची भेटतेय तुला असं झालं होत, मग नवऱ्याला सांगितलं- तू तुझ्या मित्रांसोबत एन्जॉय कर ...मला