लेडीज ओन्ली - 10

  • 5.8k
  • 2.1k

|| लेडीज ओन्ली ||{ भाग - १० }अन् आयुष्यानं मला या शहरात आणून सोडलं. विजयाताईंच्या जीवनाची कहाणी ऐकून जेनीचे डोळे चिंब भिजले होते. तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हते तरीही गहिवरल्या शब्दात तिने विचारले.. "आणि मग पुढे..?" ' पुढे काय..! रोज एक नवा वणवा सज्ज असायचा पेटवून द्यायला. आपणही पेटून घ्यायचं त्याच्याबरोबरीनं. होऊ द्यायची राख सर्वस्वाची. अन् पुन्हा झेपावायचं राखेतून आकाशाच्या दिशेने फिनिक्सागत..! सुरूवातीच्या काळात भीक मागितली. शहराची घाण काढली. लोकांची भांडी घासली. आयुष्य फरफटत नेत होतं. पण मीही थांबले नाही. ते नेईल तिकडे जात राहिली. आयुष्य दाखवील ते दुःखाचे दशावतार पाहत राहिले. खूपदा वाटायचं या नरकयातना