लेडीज ओन्ली - 9

  • 6.2k
  • 2.1k

|| लेडीज ओन्ली ||( भाग - ९ ) त्या घटनेनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. दवाखान्यातून घरी आणलं खरं मला, पण ते घर आता माझं राहिलं नव्हतं. घरातलं कुणीही माझ्याशी नीट बोलत नव्हतं. माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे माझे बाबाही माझ्यापासून दूर दूर राहायला लागले होते. आजवर माझ्या अवतीभवती खेळणारी माझी भावंडं माझ्या जवळही यायला तयार नव्हती. माझ्या हुशारीचं कौतुक करताना न थकणारी माणसं माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं बघायला लागली होती. माझा बळी देऊन स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेल्या मैत्रीणींकडे मला भेटायला, माझ्याशी बोलायलाही वेळ नव्हता. सगळंच बदलून गेलं होतं. नाही म्हणायला आई तेवढी अजूनही जशीच्या तशीच होती. लोकांनी