लेडीज ओन्ली - 8

  • 8.7k
  • 3.1k

|| लेडीज ओन्ली ||(भाग - 8) संध्याकाळची जेवणं आटोपली. जेवणानंतर शतपावली करायची म्हणून अश्रवी, जेनी अन् विजयाताई घरापुढच्या मोकळ्या रस्त्यावर फेऱ्या घालू लागल्या. "आज शतपावली नाही तर सहस्त्र पावली घालावी लागणार बहुधा... " अश्रवी हसत बोलली. " येस्स.. इतकं मनसोक्त आणि चविष्ट जेवण.. आफ्टर अ लाँग लाँग टाईम... मला तर पायच उचलता येत नाहीयेत.. " जेनीनंही अगदी पोट फुगेपर्यंत खाल्लं होतं," थँक्यू आई... फॉर ग्रेट टेस्टी फूड... "" अगं थँक्यू काय... आमच्याकडे नाही चालत बरं हे थँक्स बिक्स... " विजयाताई बोलल्या. " येस जेनी... एखादे दिवशी जेवू घालणाऱ्याला 'अन्नदाता सुखी भवः' म्हणतील... पण रोज जेवण बनवणाऱ्या आईचे आभार