शिक्षकास आभार पत्र

  • 20.8k
  • 4.2k

आदरणीय शिव्हरे सर, नमस्कार सर मी तुमचा एक विदयार्थी कदाचित तुम्हाला आठवत असेल इतकं मला माहीत नाही पण तुमच्या हातचा खलेल्ला मार मात्र मी अजुनही विसरलो नाही. खरं तर मला नेमकं तेव्हा कळ लच नाही की तुम्ही विनाकारण का बर आम्हाला बदडत होता. तेही शुल्लक केस वाढलेले दिसले की त्याची त शामत यायची तुमच्या हस्ते. खरंच सर जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या बद्दल ऐकलं होत मला फार नवल वाटायचं की संपुर्ण शाळा तुमचा आवाज आयकुनच चिडी चूप बसुन जायची. तसा दरारा होताच तुमचा की मोठं मोठे धडधाकट मुल ही तुमच्या नावानेच घाम सोडत होते.