सौभाग्य व ती! - 15

  • 6.7k
  • 2.9k

१५) सौभाग्य व ती! "काय चालल तायसाब?" कामाला आलेल्या विठाबाईने विचारले. "रोजचेच. माझ्या कर्माची फळे." "छकुल्या बाय ऊठल्या न्हाईत?" "नाही ऊठली. विठाबाई, तू सुद्धा लपवलस ग?" "मव्ह करम फुटलं. तायसाब, लपवलं आन म्या? त्ये काय?" "हे...हेच... मला तरी कुठे सांगवते? मी लग्नाला गेले आणि ह्यांनी काय काय धुडगूस घातला ते..." "ताईसाहेब, रोजचं मड त्येला कोण रड?..." "रोजचे नाही गं. त्या सटवीसोबत ह्यांनी लग्न..." "काय? जीभ झडो मही पर म्या काय ऐकत्ये तायसाब? म्या सपनात तर न्हाई? लगीन आन् त्येंच? त्वांडातून..." "तुला तोंडातून काढवत नाही