लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ४

  • 6.9k
  • 2.6k

सकाळी जाग आली तेव्हा बराच उशीर झाला होता. अविचे दोन कॉल्स सकाळी सात वाजताच येऊन गेले होते. मी या गडबडीत त्याला झालेला प्रकार कळवलाच नव्हता. त्यालादेखील खूप वाईट वाटले. तो लगेचच भेटायला येण्यासाठी निघत होता. पण मी त्याला आईला भेटून मग शक्य असल्यास इकडे यायला लावले. कारण आधार देणारा तो एकटाच होता. दुपारी जेवताना कळले की, बाबांच्या वार्ड मधील दोन गृहस्थांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचे शव शवागरात ठेवले होते. त्यांचा अंत्यविधी करायला देखील कुणीच नव्हते. कारण दोघांच्या घरातील सर्व जण क्वारांटाईन केले होते. मला त्यांच्याविषयी खूप वाईट वाटत होते. अंत्यविधी करण्यासाठी देखील कुणीच नसणे म्हणजे किती शोकांतीका होती. मग