सहजीवनातील वास्तव

  • 5.5k
  • 1
  • 1.5k

“ भाईकाका, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. कधी भेटशील सांग.” इराच्या आवाजाच्या पातळीवरून मामला काहीतरी गंभीर दिसतोय याचा अंदाज भाईकाकांना आला. तरीही आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत ते इराला म्हणाले, “ हम तो हमेशा तुम्हारे पास ही है बेटा,बोलो क्या हुकूम?”“ हे बघ भाईकाका, मी खूप गंभीरपणे बोलतेय, माझा अजिबात चेष्टेचा मूड नाहीये. तू आज संध्याकाळी भेटशील का ते सांग म्हणजे मी येते.” इरा वैतागलेली वाटत होती. “ हो, भेटू आपण संध्याकाळी. ये नक्की. तुझ्या बच्च्याला पण घेऊन येणार आहेस का की एकटीच येतेस?” भाईकाकांनी परत खोडी काढली. “ चिन्मय नाव आहे त्याचे. तू नाही हं त्याला बच्च्या म्हणायचे.