महती शक्तीपिठांची भाग १७

  • 5.6k
  • 1
  • 2.2k

महती शक्तीपिठांची भाग १७ अश्विन शुध्‍द प्रतिपदेला घटस्‍थापनेने विधीवत पूजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्‍या कुंडामध्‍ये मातृका भरुन त्‍यावर विवीध पाच प्रकारचे धान्‍य टाकले जाते. त्‍या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने व श्रीफळ ठेवले जाते व त्‍या कुंडाच्‍या बाजूला पाच ऊस उभे करून पुष्‍पहार अर्पण केला जातो व प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवलेजातात. त्‍याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्‍थापने पासून ते दस-यापर्यंत पायस म्‍हणजे दहिभात, पुरणपोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो. घटस्‍थापनेपासून चार दिवसपर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्‍ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पूजा विधी नियमीत केल्‍या जातात. नवरात्रातील पंचमीस/ललितापंचमीस देवीची अलंकार पूजा केली जाते. महापूजा व महाआरती केली