देजा व्हू

  • 17.4k
  • 3
  • 5.2k

नयन, एकवीस वर्षाचा मुलगा. दिसायला साधारण, पण लाजाळू वृत्तीचा, आपल्याच जगात हरवलेला, पण स्वतःपेक्षा जास्त विश्वास विज्ञानावर ठेवणारा असा साधा भोळा मुलगा. त्याला मित्र तेवढे न्हवतेच, पण त्याचा जुळा भाऊही त्याच्याच वयाचा, दोघांचेही चेहरे एकसमान, आणि दोघे भाऊ कमी पण मित्र जास्त होते. नयनचा भाऊ अमन दुसऱ्या शहरात शिक्षण घेत होता. दोघांचे बोलणे व्हायचे फोन वर, पण तरीही आठवण वेगळीच सतावायची एकमेकांची. जेव्हापासून अमन दुसऱ्या शहरात गेला आहे, तेव्हापासून नयन आपल्या गावी एकटा पडला आहे. तो आपल्या दुसऱ्या मित्रांसोबतही राहणे पसंत करत नाही. तो आधीपेक्षाही जास्त एकटा