महती शक्तीपिठांची भाग १६

  • 6.7k
  • 1
  • 2.5k

महती शक्तीपिठांची भाग १६ ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून ही देवी उदयास आली आणि तिने दुर्गेचा अवतार घेतला असे उल्लेख पुराणात आढळतात व त्यावरून तिला ब्रह्मस्वरूपिणी म्हणूनही ओळखले जाते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक असे साक्षात ब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजे सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी. देवीचे स्थान मनाला भावते. तसेच गडावरील १०८ कुंड, प्राचीन मंदिरे, उत्सव, मलखांब, अनेक संतांचा व सरदाराच्या दान वृत्तीच्या अनेक आख्यायिका आहेत . सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. गडावर मार्कंडेय ऋषींनी तपस्या केली आहे . मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक व पुराणे ऐकवत असत म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून ते पुराणे ऐकत असल्याचेही म्हटले जाते.. येथेच