महती शक्तीपिठांची भाग १५

  • 6.4k
  • 1
  • 2.3k

महती शक्तीपिठांची भाग १५ आदीशक्‍तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात प्रमुख देवींची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत.. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून ते अर्धपीठ समजले जाते . या सर्वांची माहिती खाली दिली आहे वणी (सप्तशृंगी) माहूर (देवी रेणुकामाता) श्री क्षेत्र तुळजापूर