एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो शंकराचा खूप मोठा भक्त होता म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत. त्याला नंदा नावाची एक बायको होती. ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे. कारण ही तसेच होते, शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतेच काम करायचं नाही. त्याची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची " मी एकटीच काम करू का ? संसार करायचं असेल तर काही काम बीम करावं लागेल की नुसतं ओम नम: शिवाय म्हटलं की पोट भरते का ?" तिच्या बोलण्याकडे महादेव मात्र दुर्लक्ष करायचा. त्याचे नित्य एकच काम असायचे, रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदीर समोरील