वारी पंढरीची.... आता आषाढी एकादशी जवळ आल्याने सगळ्यांनाच त्या पांडुरंग विठलाच्या भक्तीची ओढ लागली आहे... त्याच्याविषयी थोड जाणून घेवूय.. ?संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसा आर्त जाच्या मनी त्याची चक्रपाणि वाट पाहे ? ....एकदा का आपल्या मनाला पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली असेल आणि अंतकरणातून आपण त्या देवाचे नाव स्मरण केले तर त्या देवालाही आपलीच येण्याची उत्सुकता असते असे म्हणतात हे असे सुख वारकऱ्यांच्या नशिबात असते... ..?. होई होई वारकरी... डोळा पाही पंढरी..? पंढरीचा वारकरी असे स्वर्गी देखिल सुख नाही ..वारकरी होण्यासाठी सुद्धा आणि एक जन्माची पुण्याई लागते असे म्हणतात...