सौभाग्य व ती! - 5

  • 9k
  • 3.5k

५) सौभाग्य व ती ! पोपटाने वाड्याची साथ सोडली हे नयनच्या लक्षात आले. प्रभाकडे काय झाले ते पाहण्यासाठी ती तिकडे निघाली. वाड्यात प्रभा जोरजोराने रडत म्हणाली, "बघ रे सदा तुझे मामा बोलतच नाहीत. थोडावेळापूर्वी जोरजोराने छाती चोळत छातीत दुखतंय म्हणाले आणि लगेच हे असे शांत झाले. असं कसं झाले रे?" नयनकडे लक्ष जाताच ती पुढे म्हणाली, "कुणाची नजर लागली रे माझ्या सोन्यासारख्या संसाराला?" असे म्हणत ती जोरजोराने रडू लागली. नयनने सारे विसरून प्रभाला सांभाळले.