नारायण धारप यांस पत्र

  • 15.8k
  • 4.7k

माननीय कै. नारायण धारप सर यांस, आपल्या रहस्यमय लेखणीने मराठीतला एक काळ ज्यांनी गाजवला अश्या सिद्धहस्त लेखकाला सामान्य वाचकाचा मनापासून सलाम. लहानपणापासून आपल्या कथा वाचून मी माझ्या मनातल्या रहस्य जाणून घेण्याच्या उर्मिस शांत करत गेलो. 1960 च्या दशकात जी आपण लेखणी उचलली ती अखेरपर्येंत खाली ठेवली नाहीत, या सातत्याला शतशः नमन. त्यामुळेच रहस्यकथांचे निरनिराळे प्रकार मला जाणून घेण्यास मोलाची मदत झाली. मराठी साहित्यात भयकथा या प्रकाराला आलेली मरगळ आपल्या रहस्यमय आणि वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या लेखणीने पिटाळून लावली. मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा यांचे दालन आपण समृद्ध केलेत. मुळात आपल्या कथांचे विषय हेच प्रामुख्याने आकर्षणाचे एक कारण आहे. त्यातही पुढे कथेला समर्पक अशी