संत कान्होपात्रा

(1.2k)
  • 13.8k
  • 3
  • 5.2k

?ओम हरये नमः? ही कथा आहे पंढरपूर पासून साप कोसावर असलेल्या मंगळवेढ्याच्या एका धनाढ्य श्यामा नायकिन ची मुलीची....,? भक्त कान्होपात्रा ची ? ज्याप्रमाणे उकिर्ड्यात एखादं प्राजक्ताच झाड फुलांनी बहरलेलं असतं त्याच प्रमाणे कान्होपात्रा ही एका हीन कुळात जन्म घेऊनही विठ्ठलाची परमभक्त होती..❣️ कान्होपात्रा ही अतिसुंदर पुष्पराज कमळाप्रमाणे नाजूक होती..त्यास भरीस भर म्हणून तिचा कंठ कोकिळा प्रमाणे सुमधुर होता.. श्यामा गणीकेने कान्होपात्रा ला नृत्य व गायन कलेत निपून बनवण्यासाठी एका गायन आचाऱ्याला तिला शिष्य बनवून घेण्यासाठी विनंती केली? विठ्ठलाच्या परम कृपेमुळे तिला साधना शिकवणारी गुरुजी हे वारकरी संप्रदायाचे विठ्ठलाचे परम भक्त होते त्यामुळे त्यांनी कान्होपात्रेला लहानपणापासूनच नृत्य व गायन शिकवता शिकवता