काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र देवाघरी गेला. म्हणजे मेला हो. अर्थात देवाघरी गेला असे म्हणता नाही येणार. कारण तो अजूनही इथेच राहिलेला आहे... भूत बनून... एक छानसं, साधं सरळ भूत... एकतर तो दिसायला चिकना होता त्यामुळे चिकनं भूत बनला. परवा रात्री मी नेहमीप्रमाणे माझं काम करत बसलो होतो. कॉम्प्युटरवर हो. तेवढ्यात तिथं प्रकट झाला. मी घाबरलोच. भूत कितीही चिकनं असलं तरी भीती वाटतेच ना? तसा मला म्हणाला... “मिल्या... लेका घाबरतोस काय असा?” खरंय म्हणा... आता भूत झाला असला तरी आपला मित्रचं आहे तो... त्याला काय घाबरायचं? मी हा विचार करत होतो तेवढ्यात पुढं म्हणाला... “अरे बोल की... विचार काय करतो