एक पत्र प्रिय शाळेस

  • 13.3k
  • 3.3k

एक पत्र प्रिय शाळेस!माझी अतिप्रिय, माझे सर्वस्व,माझी शाळा,तुज नमन! तुला वंदन! माझ्या आयुष्यातील कमी-जास्त चाळीस वर्षे मी तुझ्या सान्निध्यात होतो. दहा वर्षे शालेय विद्यार्थी म्हणून, दोन वर्षे विद्यालयात विद्यार्थी म्हणून तर तीस वर्षे शाळेत शिक्षक म्हणून 'शाळा' या ज्ञानमंदिरात म्हणजे तुझ्या समवेत वाढलो, हसलो, रडलो, खेळलो, पडलो, उठलो, शिकलो, बोललो, सुसंस्कारित झालो. शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना खेळवले, हसवले, वाढवले, रडवले, मारले, ओरडलो, रागावलो, शिकवले, हात धरून धडे गिरवून घेतले. ह्याची तू आणि केवळ तूच साक्षीदार आहेस. खरवड, महालिंगी, भाटेगाव आणि डोंगरकडा या गावांमध्ये